Saturday 30 April 2011

एक मे - द हार्ट कनेक्षन

कलेला भाषेच्या सीमा अडवू शकत नाहीत हे पुन्हा सिद्ध होत असते. १ मे या एकाच दिवशी निर्मान झालेल्या गुजरात आणि महाराष्ट्र या शेजार्‍यांमध्ये केवल भौगोलीक नाही तर बर्‍याच गोष्टी समान आहेत.
संस्कृती,खाद्यपदर्थ लोकांचे स्वभाव , श्रीखंड , पुरणपोळी पोहे( गुजरातीत पौवा) सुरळीच्या वड्या( खाम्डवी) असे अनेक समान धागे आहेत.
पण या सगळ्याव्यतीरिक्त एक समान धागा गुजराती आणि मराठी भाषीकांच्यात समान आहे तो म्हणजे नाटक आणि रंगभूमीचे प्रेम.
मराठी रंगभूमीला १५० वर्षांची परंपरा आहे. तीच गोष्ट गुजराती रंगभूमीची..मराठी आणि गुजराथी नाट्य परंपरेला संस्कृत नाटकांचा वारसा लाभला
ज्या काळात बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपनी , गोविन्द बल्लाळ देवल यांनी मराठी रम्गभूमीला भक्कम पाया दिला अगदी त्याच काळात मदन थिएटर्स,देसी नाटक समाज तेच कार्य गुजराथी रंगभूमीवर करीत होते.
दोन्ही राज्यांची निर्मीती झाल्यानंतरचा गेल्या ५० वर्षाचा काल पाहिला तर आश्चर्यकाररित्या गुजराथी आणि मराठी रंगभूमीची धाव समांतरपणे झाले आहे.
गावोगावी होणार्‍या एकांकीका स्पर्धा नी नव्या मराठी रम्गभूमी चा पाया रचला. सिनेमा,टीव्ही सारख्या नव्या माध्यमांचे आव्हान समर्थपने पेलायला बळ दिले आहे.
पुरुषोत्तम करंडक ,राज्य नाट्य स्पर्धा , छबीलदास चळवळीने मराथी रंगभूमीला अनेक नव्या दमाचे समर्थ अभिनेते ,लेखक,दिग्दर्शक दिले. महेश एलकुंचवार , जब्बार पटेल, अतुल कुल्कर्णी , सतीश आळेकर ही नावे.
मुम्बई तील भारतीय विद्य भवन्स च्या स्पर्धा , आय एन टी च्या आंतर महाविद्यालयेन स्पर्धा नी गुजराथी रंगभूमी बबत हेच केले. या स्पर्धंमधून कांती मडीया , प्रबोध जोशी , परेश रावळ , मुकेश रावळ ,सुजाता मेहता , सिद्धार्थ रांदेरीया यांसारखी हिरे निर्माण केले.
साधारणतः १९६० च्या दशकात मराठी रंगभूमी वर बरेच बदल होत होते. जुन्या संगीत रंगभूमीचा जवळजवळ अस्तच झाला होता. नाटकाच्या संदर्भात नुसते तात्रज्ञानातच नाही तर संहीतांच्या विषयांत सादरीकीकरणात बदल होत होए. लोकांच्या मानसीकतेतच बदल होत होते.
याच काळात गुजराथी रम्गभूमीदेखील अशाच संक्रमणातून जात होती.ज्येष्ठ गुजराथी रंगकर्मी कान्ती मडीया एक वेगळाच विचार केला. लोकानुनय आणी सवंग लोकप्रीयतेच्या फसव्या सापळ्यातून गुजराथी रंगभूमीला वाचवायचे असेल तर काही वेगळा माफ्ग अनुसरावा लागेल. या विचाराने ते झपाटून गेले.
मुम्बई ही नेहमीच गुजराथी आणि मराठी रंगभूमी साठी सांस्कृतीक राजधानी राहिली आहे. कान्ती मडीयांसाठी मराठी रंगभूमी हा नैसर्गीक पर्याय होता.
मो ग रांगणेकरांच्या नाट्य निकेतन मध्ये जाउ लागले. तेथे कान्ती मडीयांची गाठ पडली ती प्रभाकर पणशीकरांशी .
आणि गुजराथी रंगभुमीसाठी एक नवा अध्याय सुरु झाला. प्रभाकर पणशीकरानी मराठी नाट्यसंपदा मार्फत केलेली बहुतेक नाटके कान्ती मडीयानी गुजराथी नाट्यसंपदा मार्फत केली.
अशृंची झाली फुले , अखेरचा सवाल मला काही साम्गायचय , पुत्रकामेष्ठी , तो मी नव्हेच चा गुजराथी "हुं ते नथीज" हा सुपर हीट्ट अवतार होता.
ही बहुतेक नाटके मराठी प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवुन लिहीलेली होती. निर्माण केली होती. पण गुजराथी प्रेक्षकाना सुद्धा त्यातली पात्रे ही गुजराथी समाजातीलच म्हणुनच भावली.
छेल चबीलो हा पुलंच्या तुझे आहे तुजपाशी चा गुजराथी अवतार तीच जादू करून गेला.
थोड्या वेगळ्या विषयावर असलेल्या सतीश आळेकरांच्या बेगम बर्वे चा गुजराथी प्रयोग मास्टर फुलमणी हा अगदी चपखल पणे झाला. गुजरथी प्रेक्षकाना त्याची नाळ पारशी थेअटर्स च्या जुन्या नाटकंशी जोडाविशी वाटली.
गुजराथी आणि मराठीतील नाटकांच्या कथावस्तु देखील अनेकवेळा समान असतात
पुलंचे " ती फुलराणी" आणि गुजराथी मधी "संतू रंगीली" ही दोन्ही नाटके पिग्मॅलीयन वर आधारीत आहेत. आत्रेंच्या मोरुची मावशी आनि गुजराथी "मनुनी मासी" यांचे विषय एकच आहेत.
" करायला गेलो एक" आणि गुजराथी " गुज्जु भाईये गाम गाजाव्या", मराटी नटसम्राट आणि गुजराथी अमारी दुनिया तमारी दुनिया , जागो मोहन प्यारे आणि गुजराथी पप्पु पास थई गयो , मराथी चूक भूल देणे घेणे आणि गुजराथी "जो जो वात बहार जाय नही" अशी एक ना अनेक नाटके गुजराथी आणि मराठीत समाईक उदाहरणे आहेत.
आई रीटायर होते हे गुजराथी मध्ये " बा रीटायर थाय छे" होऊन आले
या सर्वात गुजराथी आणि मराठी रसिकाना त्या नाटकातील पात्रे तितकीच आपल्या मातीतील वाटली.
आणि हीच गोष्ट आमच्या भाषा भले गुजराथी आणि मराठे अशा वेगवेगळ्या असतील पण आमची र्‍हदये एकाच तालात धडधड्तात हे सिद्ध करते.

No comments:

Post a Comment