Wednesday 27 April 2011

एप्रील फळ ३

बाजारात आता आंबा महोत्सव् चालु असतो. प्रत्येक जण् आंब्यांचे काही ना काही करत असतो पिकलेल्या हापुसआंब्याचा मोरांबा ही खास पाककृती वर्तमान पत्रात् झळकते. घरात् घरात् त्यावर् प्रयोग् होतात साखर् आंबा गुळांबा केला बरण्यात् भरला जातो.
आंबे असतात् तरी कैर्या येतच् असतात्. आता मात्र त्या खास लोणच्या साठी येत् असतात्. एकदम कडक् आणि बिन वासाच्या ही त्यांची पहीली पारख. घरात माळावर् अडगळीत पडलेले खास कैरी फ़ोडण्यासाठी बनवलेले अडकित्त्ते घासून् पुसून् लखलखत बाहेर येतात्.खड्डा असलेल्या पाटावर् सोललेली पांढरी कैरी व्यवस्थित् बसते. एका घावात् दोन तुकडे होतात. बघता बघता कैरी च्या तुकड्यांचा ढीग् होतो. त्याना बरणीत् हळद् मिठाचे स्नान् घालुन् मुरवत ठेवतात. अंगाला चांगली हळद लागली की त्यावर् फ़ेणलेली मोहोरी ,तेल् ,मसाला, फ़ोडणी, यांचा अभिषेक केला जातो. एवढे सगळे झाले की फ़क्त् कैरीच्या लोणच्याच् हक्क असलेल्या केवळ् त्याच एका कारणासाठी बनवलेल्या चिनी मातीच्या पांढर्या तपकिरी गोल बरण्या जमिनीवर् येतात्.आणि हळदी , मसाल्याचा साज चढविलेल्या कैर्या पडदानशीन् होतात.कैरी च्या या देखण्या खानदानी तुकड्याना दृष्ट् लागु नये. बाहेरचे असंस्कृत् वारेसुद्धा लागु नये म्हणुन् बरण्या फ़डकी लाउन् पुरेपुर् बंदोबस्तात् पुन्हा फ़डताळात् रवाना होतात. या खजिन्यावर् मुलांचा डोळा असतोच्. आजी ते ओळखुन् असते. ती हळुच् मुलाना एकेक् फ़ोड् देते. बाठीच्या जवळचा कडक तुकडा ज्याला मिळतो तो आपल्याला स्पेश्यल् ट्रीटमेन्ट मिळाली आपण् आजीचे लाडके या आनन्दात् असतो. या फ़ोडीवरचा मसाला नळाखाली धुवुन् नुसत्या हळदी मिठात् मुरलेल्या फ़ोडी खाणे यात स्वर्गीय आनन्द्. ज्याने चाखले त्यालाच हे ब्रम्हरहस्य ठाउक..
एरवी खास असणारा आमरस् आता अगदीच् आम झालेला असतो. मुबलक् झाला तरी तो आपला आब राखुन असतो. आंबा पोळी , आंबा वडी हे प्रयोग् चालुच् असतात्. ताटलीला तूपाचा हात् लावुन् त्यावर् आमरसाचा पातळ् थर या रोपात् आमरस् उन्हात् बसतो. मुलांच्या तावडीतुन् सुटलेली आंबा पोळी हे आंब्याचे आणखी लोभस रूप्. गोल तलम गुळगुळीत् आंबापोळी आंब्याचे सारे गुण् घेउन् पुन्हा अवतरते.आंब्याच्या रसाचे आटवण हे आंब्याची वर्षभर आठवण् ताजी करायची गुप्त् युक्ती. सुंभ जळला तरी पीळ जळत् नाही तसे मोसम संपला तरी आम्र पुराण् काही संपत येत् नाही. बर्फ़ी आईस्क्रीम् सरबत् अशा नाना प्रकाराने आंबा भेटीला येतच् रहातो.
आंब्याचे होणारे हे कौतुक् बघुन् साक्षात भगवंताला ही "मासानाम मार्गशीर्षोहम्" च्या पुढे जावुन् "फ़लानाम आम्रोस्मीन " असेच् म्हणावेसे वाटेल.

No comments:

Post a Comment