विहीरीला पायर्या असतात.
मी लहानपणी पाहिलेली विहीर म्हणजे काळ्यारामाच्या देवळातली.
तीला पायर्या होत्या .त्याना पायर्या का म्हनायचे हा प्रश्नच होता. भिन्तीतून पुढे आलेल्या दगडाच्या टोकाला पायरी म्हणायचे. त्यातून तोल साम्भाळत आम्ही विहीरीत पडलेला चेंडु घ्यायला जायचो. आणि बहुतेक वेळेस ट्रस्टीकाकांच्या शिव्या खायचो.
काल इथे अहमदाबादपासून पासून १८ किमी वर असलेल्या अडालज गावात असलेली हीपायर्यांची विहीर बघायला गेलो. आणि एक भूलोकीचा चमत्कार पहातोय असेच वाटले.
इस १४९९ मध्ये कोण्या रुडाबाईने दुश्काळी काम म्हणून बाम्धून घेतलेल्या या विहीरी चे बांधकाम एक चमत्कारच आहे.
गेली पाचशे वर्षे हा चमत्कार इथल्या लोकानी साम्भाळून ठेवलेला आहे.
गुजरातमध्ये दुश्काळ पडलेला होता. जनतेला रोजगार मिळावा म्हणून वीरसिंह वाघेला राजाच्या राणीने ही विहीर बांधवून घेतली. थोडिशी जैन शैलीची थोडीशी हडप्पन शैलीची ही विहीर.
पाच मजले असलेली विहीर असे म्हम्तले तर आपल्या डोळ्यासमोर काहीच उभे रहात नाही.
त्या जागेवर जाईपर्यन्त काहीच कळत नाही. बाहेर लावलेला बोर्ड पाहूनही काही खुलासा होत नाही.

आपण एका देखण्या प्रवेशद्वारातून पायर्या उतरायला लागतो

पुढे येणारे दृष्य काय असेल याची अजूनही कल्पना येत नाही

आणि शब्द सापडणार नाहीत असे एक भव्य शिल्प दिसायला लागते

पाच मजले जमिनीखाली असलेले हे बाम्धकाम म्हणजे कल्पनेचा एक सुंदर खेळ आहे.
भर उन्हातून जाणार्या वाटसरुना साधू सन्यासाना घटकाभर विसावा घेता येईल ताजे तवाने होता येईल या उद्देशाने रुडाबाईने ही विहीर बांधली
इथे बाम्धकामुळे उन सावलीचा एक मजेशीर खेळ सुरू होतो.
आणि त्यामुळे जमिनीखाली पाच मजले असूनही हवा आणि उजेड खेळते रहातात

स्ट्रक्चरल सौंदर्य म्हनजे काय याची अनुभूती घेत आपण खाली उतरत रहातो

भिंतीवरील नक्षी ,आणि भुमिती ची मजा एकाच वेळेस घेता येते

आणि मग बांधकामा मधले एक एक चमत्कार बघायला मिळतात.

त्याकाळच्या इंजिनीयरिम्गची कमाल. स्प्रिंगप्रमाणे गोलाकार स्पायरल वळणे घेत खाली उतरणारा हा दगडी जिना. एकावर एक रचलेल्या दगडांची टोके एकमेकात फसवून चुना न वापरता केलेले हे बांधकाम अती अद्भुत आहे.

वावाटसरूला स्वच्छा पाणी मिळावे म्हणून रचलेली ही विहीर

इथून लवकर पाय निघत नाही.

या विहीरीत हजारभ सैन्य सहज सामावू शकायचे.
या वविहीरीचे बांधकाम वीस वर्षे चालले होते. कडक उन्हाळ्यातही विहीर आटत नाही.
एका दंतकथे नुसार सुलतान बाघेराने राजा वीरसिंह वाघेलाचापराभव केला आणि रुडाबाईसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला
रुडाबाईने विहीरीचे बांधकाम पूर्ण करू दे . ते झाल्यावर लग्न करेन असे वचन दिले.
सुलताना ने जेंव्हा जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तेंव्हा रुडाबाईने ( रुडा या जुन्या गुजराथी शब्दाचा अर्थ " चांगली") त्या विहीरीत जीव देऊन आपली आयूष्ययात्रा संपवली.
सुलतानाने चिडून विहीर बांधणार्या कारागीरांचा वध केला.

वर्णनात्मक लेखन आवडले.
ReplyDelete